rkT;k ckrE;k

izksQkbZy


दैनिक ‘नरवीर चिमाजी’ने यावर्षी 31व्या वर्षात पदार्पण केले आहे. इतका मोठ्या खडतर प्रवासात तालुक्यातील लोकप्रिय आणि लाडकं दैनिक म्हणून नावारुपास आलेल्या दैनिक ‘नरवीर चिमाजी’ने केवळ आपल्या वाचकांसाठी आणि त्यांच्या प्रेमा खातर वाटचाल सुरु ठेवली आहे. सत्य कटु असतं आणि ते प्रभावीपणे सर्वच दैनिक मांडतात असं नसतं. दैनिक ‘नरवीर चिमाजी’च्या आता पर्यंतच्या प्रवासात प्रत्येक बातमीला सत्य आणि सडेतोड मांडण्याच धरिष्ट दाखवलं आहे. त्यामुळे कुणी दुखावल, व्यथित झालं याची तमा कधी बाळगली नाही. यापुढेही दैनिकाचा हा नियम सुरु रहाणार आहे. बातमी देणारं वृत्तपत्र अशी छबी बदलून बातमीचा पंचनामा आणि जास्तीत जास्त माहिती देण्याचा पायंडा दैनिक ‘नरवीर चिमाजी‘ने जपला आहे. त्यामुळे वाचक प्रतिसादावर आपलं स्थान भक्कम बनवण्यात दैनिक ‘नरवीर चिमाजी’ला यश आलं. तालुक्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच दैनिकाचे वाचक व जाहिरातदार याचं मोठं बहुमूल्य सहकार्य लाभलं आणि त्यामुळे हे शक्य झालं. चांगल्या आणि वाईट स्थितीतून मार्गक्रमण करताना या दैनिकाला मोठा लढा द्यावा लागला आहे. वाईट प्रसंग शिकवतात त्यातून योग्य धडे घेऊन मार्गक्रमण करत रहावे असे शास्त्र सांगते. पालघर जिल्ह्यासह वसई तालुक्यातील उपेक्षित आणि वंचित यांच्यासाठी दैनिकाने योगदान दिल आहे, या पुढे ही त्यात मोलाची कामगिरी बजावत राहणार आणि त्यासाठी तुमची साथ मोलाची ठरणार आहे.
प्रगती पाटील देवलाल
संपादक - मालक - प्रकाशक